Amit Dolawat: छोट्या पडद्यालवरील मालिकांचा प्रेक्षकांचा प्रेक्षकवर्ग हा मोठ्या प्रमाणात असतो. या मालिकांमधील प्रत्येक कलाकार हा घराघरात लोकप्रिय होतात. अशी एक मालिका म्हणजे नवे लक्ष्य. या मालिकेतून अभिनेता अमित डोलवत प्रसिद्धीझोतात आला. नवे लक्ष मालिकेतील एसीपी अर्जुनच्या भूमिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नुकतंच अभिनेत्याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. त्यामुळे त्याच्या घरी आनंदाचं वातावरण आहे.
नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर कर अमितने त्याच्या लेकीची पहिला झलक चाहत्यांना दाखवली आहे. १ एप्रिलच्या दिवशी अमितला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. लेकीच्या जन्माच्या अभिनेत्याने तिचं बारसं करुन खास नावही ठेवलं आहे. 'झिश्या' असं त्यांनी लेकीचं नाव ठेवलं असून, विद्वान, हुशार असा या नावाचा अर्थ आहे. दरम्यान, अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अमित डोलावतला निभिव नावाचा ३ वर्षांचा आहे. मुलगा आहे.आता लेकीच्या जन्मामुळे त्यांचं हे चौकोनी कुटुंब आता पूर्ण झालं आहे.
दरम्यान,अमित डोलावतच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेता गेली अनेक वर्षे मराठी कलाविश्वात सक्रिय आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने मराठी मनोरंजनविश्वात स्वतःची ओळख बनवली आहे. 'नवे लक्ष्य' तसेच 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतही त्याने काम केलं आहे.