Join us
Daily Top 2Weekly Top 5

One Last Time…! ७ महिन्यात 'या' लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप, मुख्य अभिनेत्री झाली भावुक, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:52 IST

 "प्रवास इथेच संपत आहे...", मालिका संपताच अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट, आज प्रसारित होणार शेवटचा भाग

Television: सध्या स्टार प्रवाहवर नव्या मालिकांची नांदी पाहायला मिळतेय. लवकरच या वाहिनीवर नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही मालिका आहे. नव्याने सुरू होणाऱ्या या नव्या मालिकेमुळे साहजिकच वाहिनीवरील जुन्या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार.

त्यात आता जवळपास ७ महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलेली एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होत आहे. या मालिकेचं नाव म्हणजे नशीबवान. गतवर्षी १४ सप्टेंबर २०२५ मध्ये या मल्टिस्टारर मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. अखेर ७ महिन्यानंतर ही लोकप्रिय मालिका संपणार आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक हे कलाकार मुख्य़ भूमिकेत होते. मालिकेत नेहा नाईकने साकारलेली साधी-संस्कारी गिरिजा प्रेक्षकांना भावली. 

अशातच ही मालिका निरोप घेणार असल्याबाबत नेहाने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय,"One last time.. आज नशीबवानचा प्रवास इथेच संपत आहे. या सुंदर प्रवासात तुम्ही सर्वांनी नशिबवान आणि गिरिजावर खूप प्रेम केलं, साथ दिली त्याबद्दल खूप खूप आभार अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे. दरम्यान, ही मालिका संपणार असल्याचं कळताच चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Popular Marathi TV Series 'Nashibvaan' Ends After 7 Months; Actress Emotional

Web Summary : The popular Marathi television series 'Nashibvaan' on Star Pravah, is ending after seven months. Actress Neha Naik, who played the lead role, shared an emotional farewell message on social media, thanking fans for their support. The show's final episode airs today.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया