Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दबावाला कंटाळून २२ व्या वर्षी घरातून पळाली 'ही' अभिनेत्री; म्हणाली "१० वर्षांची असल्यापासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:17 IST

घरातून पळून ती मुंबईत आली आणि तिने आपलं स्वप्न पूर्ण केलं.

'गुड्डन तुमसे ना हो पायेगा' फेम लोकप्रिय अभिनेत्री कनिका मान (Kanika Mann) सध्या तिच्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कनिकाने तिच्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आपल्या करिअरसाठी कनिकाला चक्क घरातून पळून आली होती.

कनिकाने 'हॉटरफ्लाई'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती जेव्हा २२ वर्षांची होती, तेव्हापासून घरच्यांनी तिच्या लग्नासाठी तगादा लावला होता. कनिका म्हणाली, "माझ्या कुटुंबात मुलीचं लग्न २२ व्या वर्षी होणं योग्य मानलं जातं. १० वर्षांची असल्यापासून माझ्यावर लग्नासाठी दबाव होता. पण मला माझं करिअर घडवायचं होतं. घरचे तयार नसल्यामुळे अखेर मी एक चिठ्ठी लिहिली आणि घरातून पळून थेट मुंबई गाठली".

कनिकाने खंत व्यक्त करत म्हणाली, "लहानपणापासून अभ्यासासोबतच घरातील कामं करण्यावर जास्त भर देण्यास सांगितले गेले. शाळेत जा, अभ्यास करा, पण जेवण बनवणं आणि साफसफाई करणं हे मुलींना आलंच पाहिजे, असं मला नेहमी शिकवलं गेलं".

सध्या कोणाला डेट करतेय कनिका?

कनिकाच्या रिलेशनशिप स्टेटसवरही अनेकदा चर्चा होत असतात. मात्र, तिने सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. ती सध्या कोणालाही डेट करत नसून कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे तिने जाहीर केले आहे. कनिका 'खतरों के खिलाडी' आणि अनेक गाजलेल्या मालिकांनंतर आता 'नागिन ७' मध्ये दिसते आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ती एका नकारात्मक भूमितेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kanika Mann ran away at 22 due to marriage pressure.

Web Summary : Actress Kanika Mann revealed she fled home at 22 to pursue her career, escaping pressure to marry young. She aims to break traditional expectations, focusing on professional goals over early marriage, now starring in 'Naagin 7'.
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन