Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'मुरांबा' फेम रमाने फॉलो केला 'गुलाबी साडी' ट्रेंड; व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 18:00 IST

Shivani mundhekar: पहिल्यांदाच नेटकऱ्यांनी शिवानीचा हा नवा अंदाज पाहिला आहे.

सध्या सोशल मीडियावर अनेक नवनवीन गाणी वा रील्स ट्रेंड होतांना दिसत आहेत. यामध्येच सामान्यांसोबतच कलाकार मंडळीही काही मागे नाहीत. मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होणारा प्रत्येक ट्रेंड फॉलो करतात. यात खासकरुन अनेक कलाकारांनी गुलाबी साडी या गाण्याचा ट्रेंड फॉलो केला आहे. हा ट्रेंड आता मुरांबा फेम रमानेही केल्याचं दिसून आलं आहे.

मुरांबा या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिने रमा ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. मालिकेतील निरागस, सालस रमाने अल्पावधीत प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. त्यामुळे तिच्याविषयी सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. इतकंच नाही तर तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते.

शिवानीने नुकताच गुलाबी साडी या गाण्यावरील ट्रेंड फॉलो केला आहे.  या व्हिडीओमध्ये तिने तिचा लूक २ वेळा चेंज केल्यामुळे तिच्या हटके स्टाइलची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होतीये.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी