Join us
Daily Top 2Weekly Top 5

रमा-रेवा रोहित शर्माच्या जबरा फॅन्स! 'मुरांबा'मधील अभिनेत्रींनी घेतली मुंबई इंडियन्स टीमची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 11:50 IST

'मुरांबा' फेम अभिनेत्रींनी घेतली MI टीमची भेट, रोहित शर्माच्या आहेत जबरा फॅन्स

सध्या देशात आयपीएलची जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची काही कमी नाही. अनेक सेलिब्रिटीही मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसतात. तर कॅप्टन्सी पदावरुन हटवल्यानंतर रोहित शर्माची क्रेझ काही कमी झालेली नाही. रोहितच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. दोन मराठी अभिनेत्रीही रोहित शर्माच्या जबरा फॅन्स आहेत. 

'मुरांबा' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील रमा-रेवा ही मैत्रिणींची खास जोडी घराघरात पोहोचली आहे. 'मुरांबा' मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर रमा ही भूमिका साकारत आहे. तर निशाणी बोरुले रेवाच्या भूमिकेत आहे. रमा आणि रेवा दोघीही रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्या आहेत. नुकतंच त्यांनी मुंबई इंडियन्स टीमची भेट घेतली. याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

शिवानीने रोहित शर्माबरोबरचे फोटो शेअर करत फॅन मोमेंट असल्याचं म्हटलं आहे. या फोटोत सूर्यकुमार यादवही दिसत आहे. तर निशानीने फोटो शेअर करत "काय दिवस होता" असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान, सलग ३ सामन्यांत पराभव झाल्यानंतर अखेर मुंबईने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमधील पहिला विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीचा पराभव केल्याने मुंबई इंडियन्सने पॉइंट टेबलमध्येही वरचे स्थान पटकावले आहे. या विजयामुळे मुंबई इंडियन्स चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सरोहित शर्माटिव्ही कलाकारस्टार प्रवाहआयपीएल २०२४