Join us
Daily Top 2Weekly Top 5

एल्विश यादवच्या अटकेप्रकरणी मुनव्वर फारुकीची प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझा फोन..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 09:10 IST

Munawar faruqui: एल्विश यादवला रेव्ह पार्टीमध्ये विष पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

युट्यूबर आणि बिग बॉस ott 2 चा विजेता एल्विश यादव याला रेव्ह पार्टीमध्ये विष पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एल्विशला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याला १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कलाविश्वात या एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे. यामध्येच आता 'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) याने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एल्विशला अटक केल्यानंतर मुनव्वरला याविषयी मीडियाने प्रश्न विचारले. मात्र, या सगळ्या प्रकारापासून अनभिज्ञ असल्याचं म्हणत त्याने उत्तर देणं टाळलं.

नेमकं काय म्हणाला मुनव्वर?

"मला याविषयी काहीही कल्पना नाही. माझा फोन बंद होता. माझ्या फोनची बॅटरी पूर्णपणे डेड झाली होती. हे सगळं कसं काय झालं याविषयी मला काहीच माहित नाही," असं उत्तर मुनव्वरने दिलं.

नेमकं काय आहे प्रकरण?

नोएडा सेक्टर-49 मध्ये झालेल्या रेव्ह पार्टीमध्ये एल्विशने सापाचं विष पुरवल्याचं म्हटलं जात आहे.  याप्रकरणी त्याने एक व्हिडीओ शेअर करत हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र,त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. मात्र. या तपासाला योग्य सहकार्य न केल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार