Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्राच्या मैत्रीत फूट? नवा प्रोमो आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 15:24 IST

आयशा खानच्या एन्ट्रीने घरात बरेच बदल झाले आहेत.

'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतली आहे.  स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीदेखील आहे. मुनव्वर फारुकी आणि प्रियांका चोप्राची चुलत बहीण मन्नारा चोप्रा यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. पण, आता दोघांच्या मैत्रीत फूट पडल्याचे दिसून येत आहे. 

बिग बॉसच्या घरात मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानने वाइल्डकार्ड एन्ट्री घेतली आहे. आयशा खानच्या एन्ट्रीने घरात बरेच बदल झाले आहेत. इतकंच नाही तर शोमध्ये मुनव्वर आणि मन्नारा यांच्यातील मैत्रीत दुरावा निर्माण झाला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये दोघांमध्ये पुन्हा वाद पाहायला मिळाला.  कलर्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने बिग बॉस 17 चा प्रोमो शेअर केला आहे. 

मुन्नवर हा मन्नाराला म्हणतो की, 'तुला माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी कधीच पूर्ण करू शकणार नाही'. 'यावर तु सगळ्या गोष्टी अपुर्ण सोडतोस. हेच तुझ्या आयुष्याचं सत्य आहे', असे मन्नारा म्हणते. तेव्हा मुनव्वर म्हणतो, 'मी तुझ्यासोबतची मैत्री संपवतो. तु म्हणतेस ना गोष्टी पुर्ण करत नाही. तर मी या मैत्रीवर पुर्णविराम लावतो'. दोघांमध्ये भांडण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आयशा घरात आल्यापासून दोघांमध्ये वाद आणि मारामारी पाहायला मिळत आहे.

बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री घेतलेली आयशा खान एक मॉडेल तसेच अभिनेत्री आहे. आयशा खान अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. काही प्रसिद्ध गाण्यांबद्दल बोलायचे तर गिटार, रिबॉर्न आणि मोहब्बत यांचा उल्लेख करावा लागेल. आयशा खान ही साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे, तिने मुखचित्रम सारख्या अनेक साऊथ सिनेमांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :बिग बॉससलमान खानसेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार