Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरंच! गौतमी अन् स्वानंद तेंडुलकर? देशपांडे सिस्टर्सच्या फॅमिली फोटोमुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 16:48 IST

गौतमी आणि स्वानंदचं खरंच जुळलंय का!

मराठी सिनेइंस्ट्रीतील बहिणी बहिणींच्या जोड्या लोकप्रिय आहेत. त्यातलीच एक म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे-गौतमी देशपांडे (Mrunmayee -Gautami). या बहिणींचे नेहमी भांडतानाचे, रडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर बघितलेच असतील. बहिणींमध्ये होणारी सामान्य भांडणं या दोघी व्हिडिओतून दाखवतात आणि प्रेक्षकांना हसू अनावर होतं. आता नुकतंच मृण्मयीने बहिणीसोबत खूप सुंदर फोटो शेअर केलेत. यामध्ये दोघींनी निळ्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहेत. दोघीही खूप गोड दिसत आहेत. दरम्यान एका फोटोने गौतमी आणि 'त्या'च्या चर्चांना उधाण आलंय.

मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोत ती नवरा आणि बहिणीसोबत दिसत आहे. तर एका फोटोत 'भाडिपा' चा स्वानंद तेंडुलकरही (Swanand Tendulkar) दिसून येतोय. मृण्मयी तिच्या नवऱ्याच्या बाजूला तर गौतमीच्या बाजूला स्वानंद दिसत आहे. या फोटोंना मृण्मयीने कॅप्शनमध्ये लिहिले,'कार्तिकीच्या लग्नातले फायनल फोटोज...' तसंच तिने हॅशटॅगमध्ये फॅमिली फोटो असेही लिहिले. 

हे फोटो पाहून कमेंट्समध्ये चाहत्यांनी एकच सूर लावला. गौतमी आणि स्वानंद एकत्र आहेत का असतील तर खूपच आनंदची बातमी आहे असं म्हणत चाहत्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. एकाने तर 'तेंडूलकरने देशपांडेंच्या मैदानावर सेंच्युरी मारली वाटतं' अशी भन्नाट कमेंट केली आहे. तर अभिनेत्री सई ताम्हणकरने 'अरे स्वानंद तेंडुलकर!' अशी कमेंट केली. यावर स्वानंदने 'हांजी' आणि मृण्मयीने 'hmmmm hmmmm' अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे गौतमी आणि स्वानंदचं खरंच जुळलंय का याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

याआधीही गौतमीने शेअर केलेल्या एका व्हिडिओत मृण्मयी खूप रडताना दिसत आहे. कारण गौतमीने तिची खोडी काढलेली असते. तर आई मृण्मयीची समजूत काढत असते. या व्हिडिओवर स्वानंदने 'लफडी नकोयत मला' अशी कमेंट केली आहे. तर मृण्मयीने 'राजा...असं कसं चालेल, तू मूळात लफड्यात पडलायस' अशी कमेंट केली आहे. त्यामुळे या कमेंटचा आता संदर्भ लागत आहे.

मृण्मयी देशपांडे सध्या सारेगमप च्या सूत्रसंचालनात व्यस्त आहे. तर गौतमीने अद्याप कोणतीही मालिका घेतलेली नाही. मध्यंतरी गौतमीने काम करुनही पैसे न मिळाल्यावरुन आवाज उठवला होता.

टॅग्स :गौतमी देशपांडेमृण्मयी देशपांडेमराठी अभिनेतारिलेशनशिप