Join us
Daily Top 2Weekly Top 5

मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 09:53 IST

चार वर्षांनी मृणाल पुन्हा मालिकेत झळकणार आहे.

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis). लग्नानंतर मृणाल नवऱ्यासोबत अमेरिकेत स्थायिक झाली होती. बऱ्याच वर्षांनी ती भारतात परतली आहे. इतकंच नाही तर तिने आता छोट्या पडद्यावरही कमबॅक केले आहे. स्टार प्रवाह वरील मालिकेत मृणाल मुख्य भूमिकेत आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे.

मृणाल दुसानिस स्टार प्रवाह वरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत दिसणार आहे. प्रोमोमध्ये ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय अंडाळकर हेही मुख्य भूमिकेत दिसत आहेत. मृणाल आणि विजयची फ्रेश जोडी मालिकेत पाहायला मिळणार आहे. तर ज्ञानदा आणि विवेक सांगळे यांची जोडी दिसणार आहे. मृणाल ही ज्ञानदाची मोठी बहीण असल्याचं  दिसत  आहे. प्रोमोवरुन मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वाटत आहे. तसंच मृणाल तिच्या आधीच्या भूमिकांप्रमाणेच समजूतदार भूमिकेत आहे. १६ डिसेंबरपासून मालिका संध्याकाळी ७ वाजता सुरु होत आहे.

मालिकेच्या प्रोमोवर इतर कलाकारांनी कमेंट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्यात. तर मृणालला इतक्या वर्षांनी पाहून चाहते खूश झालेत. तिला पुन्हा मालिकेत पाहणं ही चाहत्यांसाठी पर्वणीच आहे. २०१६ मध्ये मृणालने नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. मृणाल शेवटची 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेत दिसली होती. २०२० मध्ये या मालिकेने निरोप घेतला होता. यानंतर ती अमेरिकेत गेली. आता नवरा आणि मुलीसह मृणाल पुन्हा भारतात शिफ्ट झाली आहे. मृणालने करिअरच्या सुरुवातीला 'माझिया प्रियाला प्रीत कळेना','तू तिथे मी','अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकांमध्ये काम केलं होतं.

टॅग्स :मृणाल दुसानीसटिव्ही कलाकारटेलिव्हिजन