'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणची (suraj chavan) भूमिका असलेल्या 'झापुक झुपूक' सिनेमाची (zapuk zupuk movie) सध्या चर्चा आहे. आज (२५ एप्रिल) 'झापुक झुपूक' सिनेमा सगळीकडे रिलीज झालाय. बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जिंकलेला सूरज चव्हाण या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सिनेमाकडे होतं. अशातच दिग्दर्शक केदार शिंदे असल्याने अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. सिनेमात खास भूमिकेत झळकलेल्या मिलिंद गवळींनी 'झापुक झुपूक' सिनेमाचे पडद्यामागील क्षण शेअर करत खास पोस्ट लिहिली.
मिलिंद गवळी लिहितात की, "आमदार पंजाबराव मोहिते" . अजून एक छान भूमिका जगायला मिळाली, केदार राव शिंदे यांच्या कल्पनेने जन्माला आलेली ही भूमिका.आधी पंजाबराव ची भूमिका जन्माला आली आणि मग, केदारावांना वाटलं की मिलिंद गवळी या भूमिकेसाठी योग्य ठरतील, आणि मग पटकथाकार ओमकार मंगेश दत्त यांनी ती कागदावर उतरवली, अनेक लोकांनी माझ्या या भूमिका खूप मेहनत घेतली, costumes, makeup , dubbing, माझा staff आज ती भूमिका थिएटरमध्ये लोकांसमोर येणार आहे, पद्धती योग्य रीतीने वठवली आहे की नाही हे आता मायबाप प्रेक्षकच ठरवणार."
"मला मात्र या आयुष्यामध्ये अजून एक वेगळं आयुष्य जगायची संधी मिळाली, आमदार पंजाबराव मोहिते, भारी आयुष्य असतं राव या अशा आमदारांचं, नशीब मला काही दिवसांसाठीच हे असं आयुष्य जगायला लागलं, अशा प्रकारचे खरे आमदार कसा आयुष्य जगतात, आणि त्यांच्या निर्णयावर असंख्य सामान्य माणसांची आयुष्य घडवली किंवा बिघडवली जातात. या सिनेमांमध्ये माझी खूप छोटी भूमिका आहे, मुख्य भूमिका तर सुरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, पायल जाधव, आणि हेमंत फरांदेया यंग आणि टॅलेंटेड पोरांच्या आहेत, आणि या पोरांनी जीव ओतून काम केलं आहे. या सिनेमांमध्ये दिपाली पानसरे आणि पुष्कराज चिरपुटकर यांची कामही उत्तम झाली आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल अशी मला खात्री आहे."