Join us

यश आणि जेसिका करणार लग्न; एकाकी पडलेली नेहा स्वीकारणार या लग्नाची जबाबदारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 18:49 IST

mazi tuzi reshimgath: समीर या लग्नाचं प्लॅनिंग सांगत असता तो नेहाला या लग्नाची जबाबदारी घ्यायला सांगतो.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच यशच्या गर्लफ्रेंडची जेसिकाची एन्ट्री झाली आहे. जेसिकाच्या येण्यामुळे या मालिकेला एक वेगळंच वळण मिळालं असून ही मालिका आता आणखीनच रंजक झाली आहे. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घ्यायचा चाहते उत्सुक आहेत. एकीकडे नेहाच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी यश, समीर, शेफाली सगळेच प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे नेहा तिच्या मनातील भाव सांगण्यास तयार नाही. त्यामुळेच आता यश मोठं पाऊल उचलणार आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये समीर यशच्या लग्नाची तयारी करतांना दिसत आहे. यश आणि जेसिका यांचा ग्रँड वेडिंग कशा स्वरुपाचं असेल याचं प्लॅनिंग तो नेहाला सांगत आहे. इतकंच नाही तर या लग्नाची जबाबदारीदेखील तो नेहाला घ्यायला सांगतो.

दरम्यान, समीर या लग्नाचं प्लॅनिंग सांगत असता तो नेहाला या लग्नाची जबाबदारी घ्यायला सांगतो. परंतु, नेहा ही जबाबदारी घ्यायला नाकारते. एकीकडे ती मन मारुन यश आणि जेसिकाचं लग्न व्हावं यासाठी प्रयत्न करते. तर दुसरीकडे या लग्नाची जबाबदारी नाकारते. त्यामुळे आता या मालिकेत पुढे काय होणार, नेहाचं आणि यशचं लग्न होणार की तो जेसिकासोबत संसार थाटणार हे मालिका पाहिल्यावर प्रेक्षकांना कळणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनश्रेयस तळपदे