Join us

आजोबांनी दिली नेहा-यशच्या नात्याला परवानगी; साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:27 IST

Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये  आजोबा, परीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतात.

गेल्या कित्येक दिवसांपासून 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत नेहा आणि यश यांच्या नात्यात चढउतार येत आहेत. आजोबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी नेहा आणि यश लग्न झाल्याचं खोटं नाटक करत होते. मात्र, आता त्यांचं सत्य यशने स्वत: आजोबांना सांगितलं आहे. इतकंच नाही तर परी, नेहाची मुलगी असल्याचंही ते सांगतात. परंतु, कोणतीही नाराजगी न दाखवता आजोबा नेहा-यशच्या नात्याला संमती देतात. त्यामुळे आता चौधरींच्या घरात लवकरच सनईचे सूर घुमणार आहेत.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये  आजोबा, परीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतात. जो ऐकून नेहाला धक्का बसतो. परंतु, हा प्रकार कुठे तरी थांबला पाहिजे यासाठी यश आजोबांना परीची खरी आई नेहा असल्याचं सांगतो.

दरम्यान, सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर आजोबा काय निर्णय घेतील हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर असतो. मात्र, आजोबा हसत हसत या नात्याला परवानगी देतात. इतकंच नाही तर त्यांच्या संमतीनेच ते नेहा आणि यशचा साखरपुडादेखील करतात. त्यामुळे आता या मालिकेत नेहा आणि यश यांच्या खऱ्या नात्याला सुरुवात होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे