Join us

लग्नानंतर डिंपलसमोर येणार 'देवमाणूस'चं खरं रूप; लग्नाच्या पहिल्याच रात्री देणार भयानक गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:46 IST

Ddevmanus 2: अजितकुमार आणि डिंपल एकमेकांशी मोठ्या थाटात लग्न करतात. मात्र, या लग्नाच्या पहिल्याच रात्री डिंपलला एक भायनक गिफ्ट मिळतं ज्यामुळे ती पुरती घाबरुन जाते.

'देवमाणूस' (devmanus) ही भूमिका छोट्या पडद्यावर विशेष गाजली. डॉक्टर होऊन लोकांचे प्राण घेणारा डॉ. अजितकमार याचं गुढरित्या असलेलं आयुष्य प्रेक्षकांना विशेष भावलं. त्यामुळेच या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. एकामागून एक मृत्यूचं सत्र सुरु असतानाच या अजितकुमार आणि डिंपल एकमेकांशी मोठ्या थाटात लग्न करतात. मात्र, या लग्नाच्या पहिल्याच रात्री डिंपलला एक भायनक गिफ्ट मिळतं ज्यामुळे ती पुरती घाबरुन जाते. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे.

'देवमाणूस'च्या पहिल्या भागात डिंपल आणि अजितकुमारचं लग्न दिव्या सिंगमुळे अर्धवट राहतं. दिव्या भर मांडवातून अजितकुमारला लग्नाच्या मांडवातून पोलिस स्टेशनला नेते. मात्र, देवमाणूस २ मध्ये या जोडीचं निर्विघ्नपणे लग्न पार पडतं. 

पहिल्या भागात दिव्या या लग्नात अडसर ठरते. तर दुसऱ्या भागात सोनूला हे लग्न मान्य नसतं. त्यामुळे या लग्नाला तिचा विरोध असतो. मात्र, हा विरोध झुगारुन अजितकुमार डिंपलशी लग्न करतो. इतकंच नाही तर लग्नाच्या पहिल्याच रात्री अजितकुमार डिंपलला सोनूशी निगडीत गिफ्ट देतो.

अजितकुमारने काय दिलं गिफ्ट?

 लग्नाला विरोध केला म्हणून अजित कुमार सोनूचा खून करतो आणि तिची  डेडबॉडी डिंपलला गिफ्ट म्हणून देतो. हे विचित्र गिफ्ट पाहून डिंपल काही काळासाठी घाबरुन जाते. मात्र, थोड्याच वेळात ही जो़डी सोनूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा प्लॅन करतात. दरम्यान, लग्नाची हळद उतरवताना सोनूची बॉडी सापडते. सोनूच्या मृत्यूमुळे मधूला वेड लागत आणि ती कुठल्या पण मुलीला सोनू म्हणून हाक मारते. आता मधूला डॉक्टर आपल्याकडे थारा देणार कि गावाबाहेर काढणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. 

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकारकिरण गायकवाड