Join us

मन उडू उडू झालं: 'कह दूँ तुम्हे..'; इंद्रा- दिपूचा 'हा' भन्नाट व्हिडीओ पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 18:19 IST

Mann udu udu zal: इंद्राला त्याच्या मनातील प्रेम दिपू समोर व्यक्त करायचं आहे. पण ते कसं करावं हेच त्याला समजत नसल्याचं यात पाहायला मिळत आहे.

अलिकडेच छोट्या पडद्यावर 'मन उडू उडू झालं' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दिपू आणि इंद्रा यांची भन्नाट लव्हस्टोरी सांगणारी ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली असून दिवसेंदिवस या मालिकेत काय घडतं हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच इंद्राने एकदा दिपूसमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. मात्र, दिपूने यावर कोणतंही उत्तर न दिल्यामुळे आता इंद्रा पद्धतशीरपणे तिला प्रपोज करणार आहे. परंतु, आपल्या मनातील भावना नेमक्या कशा प्रकारे व्यक्त करायच्या हा मोठा प्रश्न त्याला पडला आहे. 

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इंद्राला त्याच्या मनातील प्रेम दिपू समोर व्यक्त करायचं आहे. पण ते कसं करावं हेच त्याला समजत नसल्याचं यात पाहायला मिळत आहे. सोबतच 'कह दूँ तुम्हे या चुप रहूँ', हे गाणं बँकग्राऊंडला प्ले झाल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, इंद्राप्रमाणेच दिपूदेखील हळूहळू त्याच्या प्रेमात पडायला लागली आहे. मात्र, घरातील जबाबदारी, आई-वडिलांचे संस्कार या सगळ्यात गुरफटलेली दिपू हे प्रेम मान्य करायला तयार नाही. त्यामुळे आता दिपू आणि इंद्राची ही लव्हस्टोरी कोणत्या वळणावर जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारऋता दूर्गुळे