Join us
Daily Top 2Weekly Top 5

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; 13 जानेवारीला प्रसारित होणार अखेरचा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 17:11 IST

TV seial : ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली होती.

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळत आहे. यात काही जुन्या मालिका आहेत. तर, काही नवीन मालिका येऊ घातल्या आहेत. यामध्येच आता एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे ही मालिका कोणती असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसंच ही मालिका का निरोप घेणार या मागचं कारणही जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रयत्न करत आहेत.

MarathiTVInfo या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टनुसार, 'तू चाल पुढं'  ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या १३ जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. ही मालिका नेमकी का ऑफएअर जाणार या मागचं कारण अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. मात्र, ही मालिका संपणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

दरम्यान, या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दिपा परब-चौधरी हिने बऱ्याच वर्षानंतर कलाविश्वात पदार्पण केलं आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेत्री धनश्री काडगांवकरनेदेखील स्क्रीन शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वीच धनश्रीनेदेखील तिच्या सोशल मीडिया पेजवर या मालिकेच्या सेटवरचा अखेरचा फोटो शेअर केला होता.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारझी मराठीहोम मिनिस्टर