Join us

निशीच्या साखरपुड्यात ओवी अन् श्रीनूच्या प्रेमाला बहर, खोतांच्या घरात पुन्हा वाजणार सनईचौघडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:39 IST

Sara kahi tichyasathi: लाली आत्याला श्रीनू आणि ओवीच्या नात्याविषयी कळेल त्यावेळी काय असेल तिची प्रतिक्रिया?

छोट्या पडद्यावर सध्या 'सारं काही तिच्यासाठी'  ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. आतापर्यंत खोतांच्या घरात अनेक चढउतार आले. मात्र, प्रत्येकाने एकमेकांची साथ देत घरावर आलेलं संकट दूर केलं. त्यातच आता घरात निशी आणि नीरजचा साखरपुडा पार पडला आहे. त्यामुळे घरात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. या सगळ्या लगबगीमध्येच आता श्रीनू आणि ओवीचं प्रेमदेखील फुलतांना दिसत आहे.

नुकताच खोतांच्या घरात निशी आणि नीरजचा साखरपुडा पार पडला. परंतु, या कार्यक्रमात श्रीनूने सगळ्यांच्या नजरा चोरत ओवीवरचं प्रेम व्यक्त केलं.  घरात साखरपुड्याची गडबड सुरु असताना श्रीनू ओवीला नजरेने त्याच्या प्रेमाची कबुली देतो. इतकंच नाही तर गुपचूपपणे तिच्या केसात गुलाबाचं फूल सुद्धा माळतो. त्यामुळे या दोघांमधील प्रेम आता बहरु लागलं आहे.

दरम्यान, आता नीरज आणि निशीनंतर या मालिकेत आणखी एक लव्हस्टोरी उलगडणार आहे. परंतु, लाली आत्याला ओवी अजिबात आवडत नाही. त्यामुळे जर श्रीनूचं ओवीवर प्रेम असल्याचं तिला समजलं तर त्यांच्या नात्याचं पुढे काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र, प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यालाठी मालिका पाहावी लागणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार