Join us

Video: संजूवर 'गंगुबाई'चा फिव्हर; 'ढोलिडा'वर केला जबरदस्त डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 18:12 IST

Shivani sonar:शिवानीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे झळकली आहे.

'राजा रानीची गं जोडी' ही मालिका सध्याच्या काळात छोट्या पडद्यावर तुफान गाजत आहे. आतापर्यंत या मालिकेत संजू आणि रणजीत यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. मात्र, त्यांचं नातं टिकून आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील संजूने म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनारने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे आज सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. याच चाहत्यांसाठी सध्या तिने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर असंख्य ट्रेंड व्हायरल होत आहे. मध्यंतरी कच्चा बदाम या गाण्याच्या ट्रेंड सुरु असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता, गंगुबाई काठियावाडी या चित्रपटातील ढोलिडा हे गाणं ट्रेंड होतांना दिसतंय आतापर्यंत या गाण्यावर अनेकांनी रिल्स केले आहेत. यात शिवानी सोनारदेखील मागे नाही. शिवानीनेदेखील भन्नाट रिल्स तयार केलं आहे.

शिवानीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे झळकली आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये शिवानीने दिलेले एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप पाहून अनेकांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारआलिया भट