Join us

परी-यशचा धम्माल इंटरव्ह्यु पाहिला का? परीचे प्रश्न ऐकून हसू होईल अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 16:26 IST

Mazi tuzi reshimgath: परी, यशचा इंटरव्ह्यु घेणार म्हटल्यावर यश, नेहा आणि समीर तिघांनीही कमालीचं टेन्शन येतं. कारण, परी कधी कोणता प्रश्न विचारेल याचा काहीच नेम नसतो.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांचं प्रेम खुलताना दिसत आहे.  त्यामुळे सध्या मालिकेत लव्ह ट्रॅक सुरु आहे. परंतु, नेहा आणि यश यांचं लग्न होण्यापूर्वी त्यांना परीची परवानगी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे परीने यशचा इंटरव्ह्यु घ्यायचं ठरवलं. जर या इंटरव्ह्युमध्ये यश पास झाला तरच नेहा आणि यशचं लग्न होईल असा निर्णय घेतला जातो. विशेष म्हणजे सध्या यश आणि परीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ती यशला भन्नाट प्रश्न विचारताना दिसते.

परी, यशचा इंटरव्ह्यु घेणार म्हटल्यावर यश, नेहा आणि समीर तिघांनीही कमालीचं टेन्शन येतं. कारण, परी कधी कोणता प्रश्न विचारेल याचा काहीच नेम नसतो. विशेष म्हणजे जी शंका नेहा आणि यशला होती ती खरीदेखील ठरली. परी, यशला कोड्यात पाडणारे अनेक प्रश्न विचारत होती. ज्यामुळे यशची बोलती बंद झाली होती.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये परी, यशला भन्नाट प्रश्न विचारताना दिसत आहे. इतकंच नाही तर परीचे प्रश्न ऐकून यशच्या तोंडचं पाणी पळाल्याचं दिसून आलं. मात्र, परीच्या प्रश्नामुळे जरी यश कोड्यात पडला असला तरीदेखील त्याच्यातील खरेपणा आणि त्याचं नेहावर असलेलं प्रेम पाहून परी या लग्नाला होकार देते.

दरम्यान,  परीचा होकार मिळवल्यानंतर नेहा आणि यशसमोर आणखी एक आव्हान आहे ते म्हणजे आजोबांचं. कारण, नेहाचं लग्न झाल्याची गोष्ट आजोबांना माहित नाही. त्यामुळे ही गोष्ट समजल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे