Join us

शेफाली आणि समीरचं होणार लग्न?; परीने केली भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 17:52 IST

Mazi tuzi reshimgath: एकीकडे नेहा आणि यश यांच्यातील प्रेमामध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. तर, दुसरीकडे समीर आणि शेफाली यांची लव्हस्टोरी खुलत आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ.  या मालिकेत सध्या अनेक रंजकदार वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे नेहा आणि यश यांच्यातील प्रेमामध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. तर, दुसरीकडे समीर आणि शेफाली यांची लव्हस्टोरी खुलत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच शेफाली आणि समीरच्या लग्नाविषयी परीने एक भविष्यवाणी केली आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये शेफाली परीसोबत लग्नाविषयी चर्चा करताना दिसत आहे. परी जे बोलते ते खरं होतं असं शेफालीचं मत आहे. त्यामुळे समीर सरांसोबत आपलं लग्न होईल असं शेफाली परीच्या तोंडून वदवून घेते. 

दरम्यान, लवकरच समीर सर आणि शेफालीचं लग्न होणार अशी भविष्यवाणी परी करते. त्यामुळे नेहा आणि यश पाठोपाठ आता समीर-शेफाली सुद्धा लग्नाच्या बेडीत अडकणार का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार