Join us
Daily Top 2Weekly Top 5

परीशिवाय नेहा जाणार पॅलेसमध्ये रहायला?;आजोबांपासून लपवलं जाणार परीचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 18:04 IST

Mazi tuzi reshimgath: आजोबांना वाचवण्यासाठी नेहा त्यांच्याशी खोटं बोलते. मात्र, आजोबांसमोर परीचं सत्य आल्यानंतर या मालिकेत नेमकं काय घडणार ?

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नेहा आणि यश यांचं लग्न लवकरात लवकर व्हावं यासाठी आजोबा आग्रही आहेत. मात्र, परीचं सत्य त्यांना समजल्याशिवाय लग्न करणार नाही असा नेहाचा निर्णय आहे. मात्र, दिवसेंदिवस आजोबांची खालावत असलेली प्रकृती पाहात आता नेहा आजोबांशी खोटं बोलणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सिम्मी, आजोबांना वाचवायचं असेल तर त्यांच्यासमोर तू आणि यशने लग्न केलं असं खोटं सांग, असं नेहाला सांगते. इतकंच नाही तर ती नेहाला इमोशनली ब्लॅकमेलही करते. त्यामुळे नाइलाजाने नेहाला आजोबांसमोर खोटं बोलावं लागतं. इतकंच नाही तर नेहा आजोबांपासून परीचं सत्यही लपवते.

दरम्यान, आजोबांना वाचवण्यासाठी नेहा त्यांच्याशी खोटं बोलते. मात्र, आजोबांसमोर परीचं सत्य आल्यानंतर या मालिकेत नेमकं काय घडणार ?नेहा आणि यशचं नातं टिकणार की त्यांची ताटातूट होणार? हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार