Join us

कृष्णा-रायाचा वाद विकोपाला; कृष्णाने घेतला घर सोडण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 15:16 IST

Mann jhala bajindi: जोपर्यंत तू माझा पत्नी म्हणून स्वीकार करत नाही, तोपर्यंत मी या घरात येणार नाही, असा निर्धार कृष्णाने केला आहे.

'मन झालं बाजिंद' या मालिकेत सध्या अनेक नवनवीन ट्विस्ट रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. यात राया आणि कृष्णा यांच्या नात्यात प्रचंड चढउतार येत आहेत. अलिकडेच या दोघांमधील मतभेद दूर झाले होते. त्यामुळे हळूहळू त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. परंतु, पुन्हा एकदा त्यांच्यात गैरसमज निर्माण झाले असून कृष्णाने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे.

झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये राया आणि कृष्णा यांच्यात शाब्दिक वाद होत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत तू माझा पत्नी म्हणून स्वीकार करत नाही, तोपर्यंत मी या घरात येणार नाही, असा निर्धार कृष्णाने केला आहे. तर, तुला पत्नी म्हणून स्वीकार करणं शक्य नाही, असं रायाने थेट सांगितलं आहे.

दरम्यान, कृष्णा पाच परतावणसाठी माहेरी जाणार असून जोपर्यंत राया तिचा पत्नी म्हणून स्वीकार करत नाही. तोपर्यंत ती सासरी नांदायला येणार नसल्याचं तिने स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांमुळे आता या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा मोठी दरी निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. तसंच आता कृष्णा पुन्हा सासरी नांदायला येणार का? राया तिचा पत्नी म्हणून स्वीकार करेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना ही मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार