Join us

मन झालं बाजिंद! फ्लॉप होणार असं म्हणून हिणवली गेलेली मालिका टीआरपीमध्ये अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:39 IST

Man zhala bajind: सुरुवातीच्या काळात या मालिकेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे ही मालिका फ्लॉप होणार असं म्हटलं जात होतं.

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच गेल्या वर्षभरामध्ये अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'मन झालं बाजिंद'. आज ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, सुरुवातीच्या काळात ही मालिका फ्लॉप होणार असा समज अनेकांचा झाला होता. मात्र, आज तिच मालिका लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जात आहे.

'मन झालं बाजिंद' ही मालिका सुरु होऊन आता बरेच महिने झाले आहेत. या मालिकेतील राया आणि कृष्णा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना कमालीची आवडत आहे. त्यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. परंतु, सुरुवातीच्या काळात या मालिकेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे ही मालिका फ्लॉप होणार असं म्हटलं जात होतं. परंतु, सध्या या मालिकेची लोकप्रियता पाहता ही मालिका टीआरपीमध्ये यशस्वी ठरत असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, सध्या छोट्या पडद्यावरील अनेक मालिका ऑफ एअर जात असल्याचं दिसून येत आहे. यात 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिका बंद होण्याची शक्यता आहे. तसंच या मालिकांमध्ये मन झालं बाजिंद' या मालिकेचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु, ही मालिका टीआरपीमध्ये यशस्वी घोडदौड करत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार