मन झालं बाजिंद ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील राया आणि कृष्णा या जोडीला प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत. त्यातच सध्या ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. लग्न झाल्यापासून कृष्णावर अनेक संकट कोसळली आहेत. मात्र, तिच्या प्रत्येक अडचणीत, संकटात रायाने तिची साथ दिली आहे. परंतु, रायाची साथ असूनही कृष्णा त्याला एकटं सोडून घरातून निघून जाणार आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इनस्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कृष्णा घर सोडून जातांना दिसत आहे. विशेष म्हणजे आपण रायावर ओझ म्हणून राहत असल्याचं तिला वाटतं आणि त्यातून ती घर सोडण्याचा निर्णय घेते.
दरम्यान, फॅक्ट्रीमध्ये नव्या मशीनचं उद्घाटन करताना कृष्णाला जबरदस्त शॉक लागतो. ज्यामुळे तिला तिचा उजवा हात गमवावा लागतो. त्यानंतर कृष्णाची सगळी कामं, जबाबदारी रायाच पार पाडतो. अगदी तिच्या सीएचा पेपरही लिहिण्यास तो तयार होतो. परंतु, आता राया करत असलेली ही काम पाहून कृष्णाला आपण ओझ असल्याचं वाटत आहे. त्यामुळेच ती घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. परंतु, कृष्णा खरंच घर सोडून जाते का? राया तिचा शोध घेईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.