Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी कलाविश्वातलं ग्रँड वेडिंग; आठवडाभर चालणार नेहा-यशचा लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 13:09 IST

Majhi tujhi reshimgath: चौधरी कुटुंबातील मुलाचं लग्न म्हटल्यावर थाटमाट, दिमाखदार सोहळा हा आलाच.

छोट्या पडद्यावर काही महिन्यांपूर्वीच सुरु झालेली लोकप्रिय मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे या मालिकेच्या प्रत्येक भागाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांच्या लग्नाची लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला नेहाचं सत्य समजल्यानं आजोबा नाराज झाले होते. मात्र, त्यांच्या मनातील गैरसमज दूर झाल्यावर त्यांनी या लग्नाला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे या दोघांचं ग्रँड वेडिंग होणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षक या लग्नासाठी आतुर झाले आहेत.

चौधरी कुटुंबातील मुलाचं लग्न म्हटल्यावर थाटमाट, दिमाखदार सोहळा हा अनायसे आलाच. त्यामुळे मालिकेतील या लग्नात यश आणि नेहाचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, मेहंदी, हळद, संगीत असे सगळे कार्यक्रमा पार पडणार आहेत. विशेष म्हणजे हे ग्रँड वेडिंग याच आठवड्यात होणार आहे.

दरम्यान, सिल्वासामध्ये हा लग्नसोहळा रंगणार असून सध्या मालिकेत या सोहळ्याचं चित्रीकरण पार पडत आहे.  इतकंच नाही तर या लग्नात एक ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. साखरपुड्यात यशच्या हातात एक नव्हे तर २ अंगठ्या पाहायला मिळणार आहेत.   त्यामुळे हा संपूर्ण आठवडा प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजनाचा ठरणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे