Join us
Daily Top 2Weekly Top 5

तितिक्षा तावडे is back! 'ज्ञानेश्वर माउली'मध्ये साकारणार संत कान्होपात्रांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:06 IST

Titiksha tawde: मालिकेत आणखी काही संतांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. आणि, याची सुरुवात संत कान्होपात्रापासून होणार आहे.

अलिकडेच सोनी मराठीवर ज्ञानेश्वर माऊली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेत मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय चेहरे झळकल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच आता अभिनेत्री तितिक्षा तावडेची (titiksha tawde) या मालिकेत एन्ट्री होणार आहे.

संतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं प्रेक्षकांना विशेष भावलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने उत्तमरित्या आपली भूमिका साकारली आहे.  यात माउलींसह  त्यांच्या कार्याला विरोध करणारे विसोबा या व्यक्तिरेखेवरही प्रेक्षकांनी प्रेम केलं. त्यामुळेच आता या मालिकेत आणखी काही संतांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. आणि, याची सुरुवात संत कान्होपात्रापासून होणार आहे.

लवकरच या मालिकेत संत कान्होपात्रा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री तितिक्षा तावडे साकरत असून तिचे कान्होपात्रा यांच्या गेटअपमधील फोटो समोर आले आहेत. 

दरम्यान, साधी साडी, हातात वीणा आणि चिपळ्या अशा मोहक रूपात तितिक्षा दिसून येत आहे. तितिक्षाची ही पहिलीच आध्यात्मिक भूमिका असून यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतल्याचं सांगण्यात येतं. विठ्ठलाची निस्सीम भक्त असलेली कान्होपात्रा आणि ज्ञानेश्वर माउली यांची जेव्हा भेट होईल, तेव्हा कोणते चमत्कार बघायला मिळतील याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार