Join us

मरेपर्यंत तुझी साथ देईन! आशुतोषने दिलं अरुंधतीला वचन; दोघांच्याही मैत्रीपलिकडील नात्याला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 13:52 IST

Aai kuthe kay karte: अरुंधती तिच्या पायावर सक्षमपणे उभी राहिल्यामुळे अनिरुद्ध सतत तिच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहे.

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवत एक ठराविक उंची गाठली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ही मालिका टीआरपीच्या शर्यतीमध्येदेखील अव्वल स्थानावर आहे.  त्यातच आता अरुंधती तिच्या पायावर सक्षमपणे उभी राहिल्यामुळे अनिरुद्ध सतत तिच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहे. इतकंच नाही तर अनिरुद्धने अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे आता तिने देशमुखांचं घर सोडलं आहे. परंतु, हे घर सोडल्यानंतर तिची आणि आशुतोष यांच्यातील मैत्री आणखीनच घट्ट होत असल्याचं दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती देशमुखांचं घर सोडून तिच्या आईच्या घरी डोंबिवलीला जाते. यावेळी तिची साथ देण्यासाठी यश आणि आशुतोषदेखील असतो. त्यामुळेच आता माझ्यासोबत माझी माणसं, माझा मित्र असा परिवार आहे. असं अरुंधती सांगते. विशेष म्हणजे अरुंधतीचं हे बोलणं ऐकल्यावर आशुतोषदेखील तिला मरेपर्यंत तुझी साथ देईन असं वचन देतो.

दरम्यान, अरुंधतीचं पहिलं गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर या मालिकेत तिच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. तसंच कित्येक वर्ष साडीमध्ये वावरलेल्या अरुंधतीच्या लूकमध्येही बदल झाला आहे.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार