Join us

पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोल्ड झाली अमृता; फोटो पाहून चाहते अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 16:25 IST

Amruta Pawar: पडद्यावर आदर्श,साध्या अभिनेत्री भूमिका साकारणाऱ्या अमृताचा एक बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता पवार. उत्तम अभिनय आणि साधेपणा यामुळे अमृताने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळेच सोशल मीडियावर तिच्या नावाची बऱ्याचदा चर्चा रंगते. अलिकडेच अमृताने मोठ्या थाटात लग्न केलं असून सध्या ती तिच्या नवऱ्यासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. यामध्येच तिचा एक फोटो चर्चेत आला आहे.

पडद्यावर आदर्श,साध्या अभिनेत्री भूमिका साकारणाऱ्या अमृताचा एक बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे तिचा हा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. पहिल्यांदाच अमृता एका नव्या लूकमध्ये चाहत्यांसमोर आली आहे.

अमृताने तिच्या हनीमूनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तिचा एक फोटो कमालीचा चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये अमृता बाथटबमध्ये पाठमोरी बसली असून तिने बिकिनी परिधान केली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ती चाहत्यांसमोर अशा रुपात आली. त्यामुळे सारेच जण थक्क झाले आहेत.  

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार