Shivani Sonar: मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. बरेच कलाकार येत्या काही दिवसात बोहल्यावर चढणार आहेत. त्यामुळे काहीं जणाचं केळवण तर काहींची बॅचलर पार्टी सुरू आहे. अशातच 'राजा राणीची गं जोडी' फेम अभिनेत्री शिवानी सोनारचे (Shivani Sonar) बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. शिवानी लवकरच 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेता अंबर गणपुलेसोबत (Ambar Ganpule) लग्नबंधनात अडकणार आहे.
अभिनेत्री शिवानी सोनारने सोशल मीडियावर तिचे आणि अंबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत."I wish some nights lasted forever "असं कॅप्शन देत शिवानीने सोशल मीडियावर त्यांच्या बॅचलर पार्टीचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये शिवानी-अंबर त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करताना दिसत आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. आता लवकरच ते लग्न करणार आहेत.
अंबरने या पार्टीसाठी राखाडी रंगाचा शर्ट आणि जीन्स पॅन्ट परिधान केली होती तर शिवानी सफेद रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसते आहे. फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद झळकतोय. शिवानी-अंबरच्या या बॅचलर पार्टीची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांनी त्यांच्या या फोटोंवर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटे, रेश्मा शिंदे तसेच अपूर्वा गोरे यांनी शिवानी आणि अंबरला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.