Join us

"दुपारी १ वाजता हॉस्पिटलमधून फोन आला तू गेल्याचा आणि...", आईच्या आठवणीत मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:20 IST

आईच्या आठवणीत मराठी अभिनेत्री भावुक, म्हणाली-"तुझ्या त्रासात तुझ्यासोबत नव्हते, पण..."

Seema Ghogle: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रचंड गाजली. ही मालिका सुरु झाल्यापासूनच टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर होती. जवळपास ५ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आई कुठे काय करते या मालिकेने निरोप घेतला. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध,संजना तसेच कांचन आजी आणि अप्पा, विमल या व्यक्तिरेखा अनेकांना भावल्या. त्यामध्ये विमल हे पात्र अभिनेत्री सीमा घोगळेने साकारलं होतं. तिने साकारलेली ही भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली होती. परंतु, सध्या ही अभिनेत्री सोशल मीडियावर आईसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आहे. 

नुकताच सीमा घोगळेने सोशल मीडियावर तिच्या आईचा फोटो पोस्ट लिहिलंय, "७ जुलै २०२०…… आई ५ वर्ष झाली ग…. तू गेलीस त्याहीपेक्षा तू ज्या पद्धतीने गेलीस ते पचवण अजूनही जड जातंय….कोव्हिडने… कुणालाही न भेटता… मुलगी म्हणून मीच कुठेतरी कमी पडली असेन म्हणून मला ही शिक्षा… तू कायम माझ्या सोबत होतीस. आहेस पण मी मात्र तुझ्या त्या त्रासात तुझ्यासोबत नव्हते. आदल्या दिवशी रात्री आपण फोनवर बोललो. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट काहीही आला तरी मी तुला घरी नेणार होते डॉक्टरांनी सुद्धा हेच सांगितल होतं. शूटिंगला जाताना सकाळी ८ वाजता मी तुला फोन केला तू तो घेतला नाहीस. तू झोपली असशील म्हणून मी पुन्हा फोन केला नाही. ना हॉस्पिटल मधल्या इतर कोणाला. तेच चुकलं माझं. दुपारी १ वाजता फोन आला हॉस्पिटल मधून तो तू गेल्याचा…. काहीच कळल नव्हतं अजूनही कळत नाहीए. आई हवी…आई हवीच, आई तुझी खूप आठवण येते…". अशी पोस्ट लिहून अभिनेत्री आईच्या आठणीत भावुक झाल्याची पाहायला मिळतेय. 

सीमा घोगळेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने 'आई कुठे काय करते, 'इंद्रायणी', 'पिरतीचा वणवा उरी पेटला' तसेच 'खुलता कळी खुलेना' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनआई कुठे काय करते मालिकासेलिब्रिटीसोशल मीडिया