Join us
Daily Top 2Weekly Top 5

उरले फक्त काही दिवस...! लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरू, 'या' दिवशी घेणार सातफेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 08:55 IST

सनईचे घुमले सूर दारी...! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, होणारा नवराही आहे अभिनेता

Celebrity Wedding: मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली. तर येत्या काही दिवसांमध्ये मराठी कलाविश्वातील  काही कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षात  बरेच सेलिब्रिटी लग्न करणार आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे साक्षी महाजन.  

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेतून साक्षी महाजन हे नाव घराघरात पोहोचलं. या मालिकेत अभिनेत्रीने साकारलेलं विद्या नावाचं पात्र खूपच गाजलं. अगदी काही महिन्यांपूर्वीच तिने सोशल मिडिया होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमॅन्टिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. "#साAth...,Our Next Chapter…", अशी पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. अभिनेत्री साक्षी महाजन अथर्व कर्वेसोबत लग्नबेडीत अडकणार आहे. 

दरम्यान, अलिकडेच साक्षी महाजनसह अभिनेत्री रेवती लेलेचं केळवण पार पडलं. कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या सहकलाकारांनी या दोघींचं केळवणं दणक्यात साजरं केलं. त्यात आता साक्षी महाजनच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे.नुकताच साक्षीचा घाणा आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम केला आहे.तिने सोशल मीडियावर याचा फोटो शेअर केला आहे. तर तिचा होणारा नवरा अथर्व कर्वेने  मित्रमंडळींनी शेअर केलेल्या स्टोरीज रि-शेअर केल्या आहेत. त्यातील एका मित्राने "3 days to go...", अशा आशयाची स्टोरी शेअर करत त्यांच्या लग्नाबद्दल चाहत्यांना हिंट दिली आहे.  त्यामुळे हे जोडपं येत्या ६ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

साक्षीचा होणारा नवरा आहे तरी कोण?

अभिनेत्री साक्षी महाजन लवकरच अभिनेता अथर्व कर्वेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अथर्व कर्वे हा मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अथर्वने 'बालगंधर्व', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' अशा गाजलेल्या मराठी सिनेमांमध्य़े काम केलं आहे. याशिवाय 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत अथर्वने केलेली भूमिका चांगलीच गाजली. अथर्व आणि साक्षी गेल्या अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sakshi Mahajan's wedding bells ring; actress to marry soon!

Web Summary : Marathi actress Sakshi Mahajan, known for 'Kon Hotis Tu Kay Zalis Tu,' is set to marry actor Atharv Karve. Pre-wedding festivities have begun, hinting at a February 6th wedding. The couple shared romantic photos, exciting fans.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया