Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेहंदी सोहळ्याचा सजला थाट! छोट्या पडद्यावरील लोकप्रिय खलनायिका लवकरच अडकणार लग्नबेडीत, फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 10:02 IST

ना कोणता गाजावाजा अन् ना कोणताही थाट! अत्यंत साधेपणात पार पडला मराठी नायिकेचा मेहंदी सोहळा

Revati Lele Mehendi Ceremony: मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रेवती लेले. पडद्यावर खलनायिका साकारुन प्रेक्षकांना आपल्या कामाची दखल घ्यायला भाग पाडणारी ही नायिका लवकरच लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीत अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा सुरु होती.आता रेवतीच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

‘लग्नाची बेडी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेवती लेलेचा मेहंदी सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या सोशल मिडियावर समोर आले आहेत.या मेहंदी सोहळ्यासाठी रेवतीने अगदीच साध्या  लूकमध्ये पाहायला मिळतेय. तिच्या हातावर सुंदर अशी मेहंदी रेखाटल्याचं पाहायला मिळत आहे.

 

सोशल मीडियावर दिलेली प्रेमाची कबुली...

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यातील एक आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली.हातातील अंगठीचा फोटो शेअर करत तिने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली. मात्र, रेवतीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा अजून रिव्हिल केलेला नाहीये.त्यामुळे अभिनेत्रीचा होणार नवरा कोण आहे, याबद्दल तिच्या सगळ्या चाहत्यांना उत्सुकता आहे.आता लवकरच अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. हे लग्न पुण्यात पार पडणार असून अनेक कलाकार या लग्नासाठी उपस्थित असणार आहेत.

वर्कफ्रंट

रेवती लेलेच्या कामाबद्दल बोलायचं लग्नाची बेडी मालिकेत मधुराणी नावाचं पात्र साकारुन ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. याशिवाय ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेमुळे देखील ती प्रचंड चर्चेत आली.काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi TV Villain Revati Lele Celebrates Mehendi Ceremony Before Wedding

Web Summary : Marathi actress Revati Lele, known for villainous roles, is getting married. Her Mehendi ceremony photos are out, showcasing a simple yet elegant look. She previously announced her relationship on social media but hasn't revealed her fiancé's identity. The wedding in Pune will be attended by many artists.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडियाव्हायरल फोटोज्