Join us

पुत्र जन्मला! 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला; गुडन्यूज शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 10:37 IST

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री झाली आई! घरी चिमुकल्याचं आगमन, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

Tv Actress: छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. या मालिकेचे तिन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. अण्णा नाईक, शेवंता,वच्छी ही पात्र देखील प्रचंड हिट झाली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. मालिकेत मंगलला आपण वच्छीच्या सुनेच्या भूमिकेत पाहिलंय. त्यात शोभा हे पात्र अभिनेत्री मंगल राणेने साकारलं होतं. तिच्या भूमिकेने देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र,सध्या ही अभिनेत्री एका कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच सोशल मीडियावर मंगलने गोड बातमी शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. अभिनेत्री मंगल राणेच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर मंगल राणेने तिची आई ती आणि तिचा लेक असा तिघांचा एकत्र फोटो शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे." लेक जेव्हा आई होते तेव्हा लेकीसोबत आईसुद्धा नव्याने आईपण जगते..." असं सुंदर कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी तसेच तिचे चाहते कमेंट्स करुन शुभेच्छा देत आहेत.

मंगल राणेने २०२४ मध्ये संतोष पेडणेकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.तिचे पती फोटोग्राफर लग्नाच्या वर्षभरातच या जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

वर्कफ्रंट

'रात्रीस खेळ चाले' मालिकेनंतर मंगलने 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा','संत गजानन शेगावीचे' यांसारख्या मराठी मालिकांमध्ये अभिनय केला.याशिवाय काही नाटकांमधून आणि सिनेमांमधूनही मंगल झळकली.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया