Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राजा राणीची गं जोडी' फेम लोकप्रिय अभिनेत्रीने थाटामाटात केलं लग्न; फोटो आले समोर, नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 11:04 IST

'राजा राणीची गं जोडी' मालिकेतील अभिनेत्रीने नुकतंच लग्न केलं आहे. 

Aishwarya Shinde Weeding: कलर्स मराठी वाहिनीवरील 'राजा राणीची गं जोडी' (Raja Ranichi ga jodi)  ही मालिका  प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील कलाकार कायमच चर्चेत येत असतात. जवळपास २ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री शिवानी सोनार तसेच मनिराज पवार मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. अगदी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिवानी सोनारने आनंदाची बातमी दिली होती. लवकरच शिवानी लग्नबंधनात अडकणार आहे. त्यापाठोपाठ मालिकेत मोनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे चर्चेत आली आहे. 'राजा राणीची गं जोडी'मध्ये तिने शिवानीच्या मैत्रीणीची भूमिका साकारली होती. अशातच सोशल मीडियावर ऐश्वर्याने तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिल्याचा पाहायला मिळतोय. 

अभिनेत्रीने इन्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत तिने लिहलंय, "१०.११.२४". त्यांच्या या फोटोंवर अभिनेत्री शिवानी सोनारने देखील कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय मराठी कलाविश्वातील कलाकारांनी देखील त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

ऐश्वर्याने अभिनेता वैभव राजेंद्रसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्याने 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' तसेच 'बॉस माझी लाडाची' या मालिकेत काम केलं आहे. तर ऐश्वर्या शिंदे सध्या भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’ व ‘तू तू मी मी’ नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया