Join us

"आनंद साजरा करायचा तरी कसा?", 'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट; म्हणाली- "यावेळी जरा भीती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:21 IST

'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट; म्हणाली...

Amruta Bane : अमृता बने (Amruta Bane) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'कन्यादान' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. सध्या अमृता स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मिहिका नावाचं पात्र साकारते आहे. तिच्या या भूमिकेमुळे तिचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. दरम्यान, अमृताचा काल वाढदिवस होता. त्याचं जंगी सेलिब्रेशनही करण्यात आलं. याचनिमित्ताने तिने सोशल मीडियावर एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

अमृता बनेने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यासोबतच अभिनेत्रीने कॅप्शनतच्या माध्यमातून तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिलियं की, "वाढदिवस म्हटलं की सेलिब्रेशन आलं. एकत्र जमणं, मज्जा, मस्ती, धमाल, फिरणं, हॉटेलमध्ये जाणं, नव्या आठवणी तयार करणं, आणि खूप खूप खूप काही... पण यावेळी जरा भीतीच वाटत होती सेलिब्रेशनची, एकत्र जमायची, फिरायला जायची, एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बिनधास्त एन्जॉय करण्याची... वाटत राहतं की आपल्यासोबही असं काही झालं तर ? फिरायला गेल्यावर आपण परत घरी येऊ ना? एकत्र जमलं की दहा ठिकाणी नजरा घुमायला लागतात, कोणी लपून रेकी तर करत नसेल ना? विशेषत: मुंबईमधल्या बिझी आणि महत्वाच्या ठिकाणी न घाबरता मोकळा श्वास घेता येईल का? सध्या भारतात आणि जगाच्या पटलावर जे काही सुरू आहे त्यामध्ये आपल्या आयुष्यातला आनंद साजरा करायचा तरी कसा..किंवा तो साजरा होईल की नाही या आणि अशा असंख्य विचारांचं काहूर माजलेला आणि समोर आलेला यावर्षीचा माझा वाढदिवस....!"

त्यानंतर पुढे अभिनेत्रीने लिहिलं, "इतकं सगळं असूनही आपण रिस्क घेतोच. कारण आपल्याला माहीत असतं की तिथे सीमेवर आपले भारतीय जवान सज्ज आणि सतर्क आहेत म्हणून आपण सुरक्षेच्या पंखाखाली बिनधास्त वावरतोय. त्यामुळे माझा वाढदिवस तर छान साजरा झालाच. मी रिस्क घेऊ शकले, घरच्यांसोबत बाहेर गर्दीत जाऊ शकले, आलिशान हॉटेलात निर्धास्तपणे एन्जॉय करू शकले, यासाठी आपलं अविरत आणि सदैव रक्षण करणाऱ्या जवानांना खरंच मनापासून धन्यवाद... आणि हो तुम्हा सगळ्यांच्याही शुभेच्छा पोहचल्या. सगळ्यांना वैयक्तिक धन्यवाद म्हणता आलं नाही पण मनापासून धन्यवाद सगळ्यांना..., असंच प्रेम आणि आशीर्वाद असुदेत. अशी पोस्ट लिहून अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.याशिवाय सद्य स्थितीवर भाष्य देखील केलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया