Sharayu Sonawane: सध्याच्या घडीला सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. सोशल मीडियायाने प्रत्येक अंग व्यापून टाकलंय. गावगाड्यापासून ते शहरांपर्यंत हे माध्यम प्रत्येकाच्या परिचयाचं झालं आहे. रिल्स या जमान्यात अनेकजण याद्वारे व्यक्त होत असतात. शिवाय सेलिब्रिटी मंडळीही यामध्ये कुठे मागे नसतात. ते सुद्धा सोशल मीडिया मार्फत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान ,सोशल मीडियावर अभिनेत्री शरयू सोनावणेही असाच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शरयू आणि श्वेता खरातचा मनमौजी अंदाज पाहायला मिळतोय.
दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्री शरयू सोनावणे आणि श्वेता खरात यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघीही मजामस्ती करताना दिसत आहेत. एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेंकाना सावरत त्या ट्रॅम्पोलिनवर उड्या मारत आहेत. त्यांच्या हा बॉण्ड पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. शरयू सोनावणेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.त्यावर श्वेता खरातने प्रतिक्रिया देत म्हटलंय, "काय दिवस होता, खूप आठवणी तयार झाल्या". दरम्यान, साताऱ्यातील हेरिटेडजवाडीमध्ये दोघीही त्यांच्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लूटताना दिसत आहेत.
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' मालिकेमध्ये अभिनेत्री शरयू सोनावणे आणि श्वेता खरात असे दोन मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरे पाहायला मिळत आहेत. या मालिकेत शरयू सोनावणेने पारू नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर श्वेता खरात अनुष्का नावाचं पात्र साकारत आहे. दरम्यान, पारु या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.