Join us

"तू फक्त माझी मैत्रीण नाहीस तर...",'नवरी मिळे हिटलरला' मधील लीलासाठी ऑनस्क्रीन बहिणीची पोस्ट, कारणही आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 15:58 IST

"तू माझी मैत्रीण नाहीस तर...", 'नवरी मिळे हिटलरला' मधील लीलासाठी ऑनस्क्रीन बहिणीची खास पोस्ट, म्हणाली...

Navari Mile Hitlarla: 'नवरी मिळे हिटलरला' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. गेल्यावर्षी मार्च महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये अभिनेता राकेश बापट आणि वल्लरी विराज यांची फ्रेश जोडी झळकली. त्यांनी साकारलेल्या एजे-लीलीचं पात्राने मालिका रसिकांना आपलंसं केलं होतं. जवळपास वर्षभरानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दरम्यान, ही मालिका जरी ऑफ एअर झाली असली तरी त्यातील कलाकार हे कायम चर्चेत असतात. आज या मालिकेतील लीला म्हणजेच वल्लरी विराजचा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने तिच्या मालिकेतील ऑनस्क्रीन बहिणीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्याची सगळीकडे चर्चा आहे.

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत अभिनेत्री आलापिनी निसळने लीलाच्या धाकट्या बहिणीची म्हणजेच रेवतीची भूमिका उत्तमपणे वठवली. या मालिकेत या दोघींचा जसा बॉण्ड होता तशाच त्या एकमेकींच्या खास मैत्रीणी आहेत. अशातच वल्लरी विराजच्या वाढदिवसानिमित्त आलापिनीने सुंदर अशी पोस्ट शेअर करत मैत्रीणीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटलवर आलापिनी हिने वल्लरी विराजसोबत काही फोटो पोस्ट करत लिहिलंय की, "वल्लरी तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...! मी कुठेतरी वाचलं आहे की तुम्हाला कोणीतरी आवडते कारण तू मला एक चांगला माणूस बनण्याची प्रेरणा देतोस, तू माझ्यासाठी नेहमीच, कुठेही आणि कोणत्याही परिस्थिती उभी असतेस. खरंतर कधीकधी तू माझ्यापेक्षा जास्त मस्ती करतेस."

त्यानंतर पुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "शिवाय तू मला गोड पदार्थ खाऊ देत नाहीस. तुझ्या मनात नेहमीच काहीतरी सुरु असतं. आणि तुला माझ्यापेक्षा मिष्टी जास्त आवडते हे असूनही मी तुझ्यावर प्रेम करते. आय लव्ह यू मला तुझी खूप आठवण येते. तू फक्त माझी मैत्रीण नाहीस तर माझ्या आईसारखी आहेस." अशी भलीमोठी पोस्ट लिहून अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया