Shweta Ambikar : गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी मनोरंजनविश्वातील बऱ्याच कलाकारांनी कुणी गाडी तर कुणी नवं घर घेत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. अशातच मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्री मुंबईत तिचं हक्काचं घर खरेदी करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे श्वेता अंबिकर आहे. नुकतीच या अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
श्वेता अंबिकर ही गेली अनेक वर्षे मराठी मालिका कलाविश्वात सक्रिय आहे. 'रमा राघव', 'दिल दोस्ती दुनियादारी', 'मुलगी झाली हो' तसेच 'अशोक मा. मा' अशा मालिकांमधून ती झळकली आहे. 'मुलगी झाली हो' या मालिकेत तिने साकारलेलं आर्या नावाचं पात्र आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. दरम्यान, श्वेता अंबिकरने ठाण्यात हे नवीन घर घेतलं आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची झलक चाहत्यांना दाखवली. त्यामुळे श्वेतासाठी तिचं हे नवीन घर खास ठरलं आहे. मराठी कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जवळपास वर्षभरानंतर अभिनेत्रीने तिच्या नव्या घरात प्रवेश केला आहे, अशी माहिती तिने दिली आहे. "माझं नवीन घर..." असं कॅप्शन या व्हिडीओला देत अभिनेत्रीने तिच्या आनंद व्यक्त केला आहे.
आर्या अंबिकरने शेअर केलेल्या व्हिडीओवर अभिनेत्री सोनल पवार,साक्षी गांधी तसंच अश्विनी महांगडेने कमेंट करत तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. आर्याने आपलं नवीन घर सजवताना श्वेताने बारीक सारीक गोष्टींचाही विचार केला आहे.