Sakshi Mahajan And Atahrv Karve Wedding: सध्या सगळीकडे लगीनसराईला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांसह बरेच कलाकार देखील लग्नबंधनात अडकत आहेत. त्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. नुकताच मुरांबा फेम अभिनेता सिद्धार्थ खिरीड लग्नबेडीत अडकला. अशातच आता छोट्या पडद्यावरील आणखी एका लोकप्रिय जोडीने लग्नगाठ बांधली.
स्टार प्रवाहवरील 'विठू माऊली' मालिकेतून घराघरात पोहोचलेले कलाकार अभिनेता अथर्व कर्वे आणि साक्षी महाजन नुकतेच लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर समोर आले आहेत. साक्षी-अथर्वचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटो,व्हिडीओंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दरम्यान, लग्नासाठी अथर्वने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता परिधान केला आहे. तर साक्षी त्याला मॅचिंग अशी सुंदर साडी नेसली आहे. दोघंही लग्नाच्या या पेहरावात अतिशय सुंदर दिसत आहेत. साक्षी आणि अथर्वच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांसह कलाकार देखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
वर्कफ्रंट
अथर्व कर्वे हा मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अथर्वने 'बालगंधर्व', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' अशा गाजलेल्या मराठी सिनेमांमध्य़े काम केलं आहे. याशिवाय 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत अथर्वने केलेली भूमिका चांगलीच गाजली. तर साक्षी महाजन अलिकडेच 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत झळकली. या मालिकेपूर्वी साक्षीनं ''उदे गं अंबे'' या मालिकेत काम केलं. यामध्ये तिने राणी नीलकांतीची भूमिका साकारली होती.
Web Summary : Actors Sakshi Mahajan and Atharva Karve, known for their roles in Marathi TV shows, recently got married in a lavish ceremony. Atharva wore an off-white kurta, while Sakshi donned a matching saree. The wedding photos are circulating on social media, drawing wishes from fans and fellow artists.
Web Summary : मराठी टीवी शो में अपने अभिनय के लिए जाने जाने वाले साक्षी महाजन और अथर्व कर्वे हाल ही में एक भव्य समारोह में शादी के बंधन में बंध गए। अथर्व ने ऑफ-व्हाइट कुर्ता पहना था, जबकि साक्षी ने मैचिंग साड़ी पहनी थी। शादी की तस्वीरें सोशल मीडिया पर वायरल हो रही हैं, जिस पर प्रशंसक और कलाकार शुभकामनाएं दे रहे हैं।