Join us

क्या बात! 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेसाठी गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचे प्रशिक्षण, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:29 IST

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून गिरीजा प्रभू (Girija Prabhu) घराघरात पोहोचली.

Girija Prabhu : स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजलेल्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून गिरीजा प्रभू (Girija Prabhu) घराघरात पोहोचली. करिअरमधील पहिल्याच मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आपल्या अभिनयाच्या जोरावर गिरीजाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर गिरीजा पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतून अभिनेत्री मालिकाविश्वात पुनरागमण करते आहे. लाडक्या गौरीला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहतेसुद्धा प्रचंड उत्सुक आहेत. दरम्यान, याच मालिकेच्यानिमित्त अभिनेत्री खूप मेहनत घेत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. 

नुकताच सोशल मीडियावर स्टार प्रवाहच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर गिरीजा प्रभूचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या आगामी मालिकेसाठी लाठीकाठीचं प्रशिक्षण घेत असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे. स्टार प्रवाहची आगामी मालिका 'कोण होतीस तू काय झालीस तू' च्या निमित्ताने कावेरी घेतेय लाठीकाठीचे धडे… असं कॅप्शन देण्यात आलं आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये गिरीजाने तिचा अनुभव देखील सांगितला आहे. 

दरम्यान, 'कोण होतीस तू काय झालीस तू' मध्ये कावेरी नावाची भूमिका ती साकारणार आहे. त्यामुळे गिरिजाचे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दरम्यान, ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेतग गिरीजा प्रभूसह अभिनेते वैभव मांगले तसेच 'लग्नाची बेडी' फेम अमृता माळवदकर आणि अमित खेडेकर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया