Marathi Celebrity Wedding: सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरु आहे. सर्वसामान्यांसह अगदी सेलिब्रिटींच्या घरी देखील लग्नाची लगबग सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय.एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. या नवीन वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्नाचा मुहूर्त गाठला असून 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्रीही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 'तुला पाहते रे' मालिकेत ईशा नावाची मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री गायत्री दातारची लगीनघाई सुरू आहे. अभिनेत्रीच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून याचे फोटोदेखील समोर आले आहेत.
दरम्यान, २०१८ साली तुला पाहते रे ही मालिका प्रसारित झाली. जवळपास वर्षभर या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेत ईशाची भूमिका साकारून अभिनेत्री गायत्री दातारने प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळवलं. सध्या ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.येत्या काही दिवसांत गायत्री लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिचा ग्रहमख विधी पार पडला आहे. त्याचा फोटो गायत्रीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे."लगीनघाई... ग्रहमख...; असं कॅप्शन देत तिने सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केला आहे.
याशिवाय गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी सुद्धा लग्नाआधीच्या विधिंना सुरुवात झाली आहे. आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर श्रीकांत चावरे याने मुहूर्तमेढ विधीचा फोटो शेअर केलाय. शिवाय लग्नासाठी मुलाकडे तयार असं हटके कॅप्शन त्याने या फोटोंना दिलंय.
गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे श्रीकांत चवरे ( Shrikant Chavare ). श्रीकांतने इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केल्यानुसार IIT Bombay मधून त्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे. तो ड्रोन फोटोग्राफर आहे. श्रीकांतला ट्रॅव्हल व फोटोग्राफीची आवड आहे.
Web Summary : Actress Gayatri Datar, known for 'Tula Pahate Re', is preparing for her wedding. Pre-wedding rituals have begun at her home. Her fiancé, Shrikant Chavare, an IIT Bombay alumnus and drone photographer, also shared photos of pre-wedding ceremonies.
Web Summary : 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार शादी के बंधन में बंधने जा रही हैं। उनके घर पर शादी से पहले के रीति-रिवाज शुरू हो गए हैं। उनके मंगेतर, श्रीकांत चावरे, जो आईआईटी बॉम्बे के छात्र और ड्रोन फोटोग्राफर हैं, ने भी शादी से पहले की रस्मों की तस्वीरें साझा कीं।