Join us
Daily Top 2Weekly Top 5

मायबापा विठ्ठला...! 'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेने सहकुटुंब घेतलं पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन; शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:09 IST

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेच्या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) घराघरात पोहोचली.

Rupali Bhosale: 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला खरा स्टारडम मिळवून दिला. अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या अभिनयासह कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेत तिने साकारलेली संजना आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. नकारात्मक भूमिका साकारुनही तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र, रुपाली वेगवेगळ्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सध्या अभिनेत्री रुपाली भोसले ही पंढरपुरला पोहोचली आहे.  नुकतेच अभिनेत्रीने पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलं आहे. याशिवाय रुपालीने सोशल मीडियावर विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील काही खास फोटो सुद्धा शेअर केले आहेत. दरम्यान, रुपाली साडी नेसून  पारंपरिक पेहराव करत प्रसाद विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचली आहे. "मायबापा विठ्ठला...", असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिचे देवदर्शनाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याचे पाहायला मिळतायतं. अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, रुपाली भोसलेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 'आई कुठे काय करते' या मराठी मालिकेव्यतिरिक्त अनेक हिंदी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'बडी दूर से आये है',' शेजारी शेजारी पक्के शेजारी', 'मन उधाण वाऱ्याचे', अशा अनेक मालिकांमध्ये रुपाली भोसले महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. 

टॅग्स :रुपाली भोसलेटिव्ही कलाकारपंढरपूरसोशल मीडिया