Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहजीवनाचा पहिला टप्पा सर! थाटात पार पडला विशाल निकम अन् अक्षया हिंदळकरचा साखरपुडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:35 IST

विशाल निकम अन् अक्षया हिंदळकरने उरकला साखरपुडा, अभिनेता म्हणाला- "देव खरंच माझ्या बाजूने होता जेव्हा…",

Vishal Nikam And Akshaya Hindalkar Engagement: ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनचा विजेता विशाल निकमने मागील काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. आधी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत त्याने होणाऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर केले होते. त्यानंतर माझी ‘अर्धांगिनी’ म्हणत त्याने होणाऱ्या पत्नीचा चेहरा दाखवला आणि त्याचं नातं जगजाहिर केलं. अशातच आता विशालने त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

अभिनेता आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा संपन्न झाला आहे. विशाल निकमनेसोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याच्या सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिनेत्याने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. "देव खरच माझ्या बाजूने होता जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिलं...", असं सुंदर कॅप्शन देत विशालने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.अभिनेत्याचे हे फोटो पाहून मराठी सेलिब्रिटींसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काल ८ फेब्रुवारी रोजी अभिनेत्याने साखरपुडा केला. 

विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी स्टार प्रवाहच्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे.

अभिनेता विशाल निकमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर'दख्खनचा राजा ज्योतिबा माझा' या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली.  सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. विशाल निकम बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vishal Nikam and Akshaya Hindalkar engaged in a grand ceremony.

Web Summary : Big Boss Marathi winner Vishal Nikam and Akshaya Hindalkar are now engaged. Nikam shared engagement photos on social media, expressing his joy. The couple, who worked together in 'Sata Jalmachya Gaathi', are set to marry soon, celebrated by fans and celebrities.
टॅग्स :विशाल निकमटेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया