Join us

विशाल निकमची अक्षया हिंदळकरसाठी खास पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाला- "काहीही झालं तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 16:16 IST

विशाल निकमने शेअर केला अक्षयासोबतचा व्हिडीओ, कारण आहे खास

Vishal Nikam Post: 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वातून अभिनेता विशाल निकम घराघरात पोहोचला. या कार्यक्रमाने त्याला नवी ओळख मिळवून दिली. सध्या विशाल स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत काम करतान दिसतो. परंतु, अभिनेत्याने सोश मीडियावर त्याच्या खास मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिचा मित्र विशाल निकमने खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

नुकताच सोशल मीडियावर अभिनेता विशाल निकमने अक्षया हिंदळकच्या वाढदिवसानिमित्त मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने आपल्या खास मैत्रिणीला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. विशालने या व्हिडीओला सुंदर कॅप्शन देत लिहिलंय, "वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा... माय सखी! जगातली सगळ्यात प्रेमळ आणि गुणी मुलगी आहेस तू. काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत कायम आहे. तू जी ले अपनी जिंदगी...", असं लिहित अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, विशाल निकमने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेता विकास पाटीस, सचित पाटील तसंच रुपल नंद, तितिक्षा तावडे यांसारख्या सेलिब्रिटी मंडळींनी कमेंट्स करत अक्षयाला वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, विशाल निकम आणि अक्षयाने 'साता जन्माच्या गाठी' या मालिकेत एकत्र काम केलं आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्रीचं सुंदर नातं निर्माण झालं. सध्या विशाल निकम स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मुख्य पाहायला मिळतोय. तर अक्षया हिंदळकर 'अबोली' मालिकेत काम करताना दिसते आहे. सध्या अभिनेत्रीची मनोरंजनविश्वात चांगलीच चर्चा आहे. नुकताच अक्षया हिंदळकरची मुख्य भूमिका असलेला पी. एस.आय अर्जुन हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयाने मराठी अभिनेता अंकुश चौधरीसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

टॅग्स :विशाल निकमटिव्ही कलाकारसोशल मीडिया