Join us

लग्नानंतर २ वर्षांनी लोकप्रिय मराठी अभिनेता झाला बाबा; महादेवांवरुन ठेवलंय लेकाचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:53 IST

'शुभविवाह', 'नवे लक्ष्य' यांसारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजीत श्वेतचंद्र.

Abhijeet Shwetchandra : 'शुभविवाह', 'नवे लक्ष्य' यांसारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजीत श्वेतचंद्र. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. याची माहिती त्याने माध्यमांना देत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली होती. आता नुकताच अभिजीत श्वेतचंद्रच्या लेकाचा नामकरण सोहळा थाटात पार पडला आहे. सोशल मीडियावर त्याने खास फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

अभिजीत श्वेतचंद्रच्या घरी २६ जानेवारीच्या दिवशी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. त्यानंतर आता दोन महिन्यांतर अभिनेत्याने त्याचं नाव जाहीर केलं आहे. इन्स्टाग्रामवर याबाबत सुंदर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने त्यामध्ये लिहिलंय, "ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव, जय शिवराय...! तुम्हाला सांगायला आनंद होतोय… श्री.महादेवाच्या कृपेने २६ जानेवारी २०२५ म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्हाला पुत्ररत्नाचा लाभ झाला. आणि १ मे ला महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून त्याचा नामकरण सोहळा पार पडला.आणि आमच्या पुत्राच नाव आहे. “अर्शिव” ( शिव स्वरूप )अर्शिव सेजल अभिजीत श्वेतचंद्र...", अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. दरम्यान, अभिजीत श्वेतचंद्रच्या घरच्या घरी थाटात लेकाचा नामकरण सोहळा पार पाडला. 

दरम्यान, अभिजीत श्वेतचंद्रने आणि सेजल यांनी २४ फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता जवळपास २ वर्षानंतर त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. 

वर्कफ्रंट

अभिजीत श्वेतचंद्रच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्याने वेगवेगळ्या मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्याचबरोबर 'बापमाणूस', 'सुभेदार' या चित्रपटांमध्येही तो झळकला आहे. सध्या अभिजीत 'कलर्स मराठी' वरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत काम करताना दिसतो आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया