Join us

"डायलॉग बोलून पर डे भरणाऱ्या नटांमध्ये..."; दिग्दर्शक समीर परांजपेचं कौतुक करत म्हणाला- "मतदानाच्या दिवशी भाजपाकडून.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 18:32 IST

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते.

Sameer Paranjape: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसते. अभिनेत्री शिवानी सुर्वे तसेच समीर परांजपे मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. समीर परांजपेची आठ वर्षापूर्वी आलेली स्टार प्रवाहवरील 'गोठ' ही मालिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर अभिनेता या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मध्ये अभिनेता तेजस प्रभू नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. दरम्यान, आज अभिनेता समीर परांजपेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी हटके अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर समीर परांजपेचा फोटो पोस्ट करत चंद्रकांत कणसे यांनी लिहलंय, "टेलिव्हिजनच्या दुनियेत फक्त डायलॉग बोलून पर डे भरणारे अनेक नट जन्माला आलेत, त्यांना इंडस्ट्रीत कामंही भरपूर मिळत आहेत. कारण हल्ली क्वालिटी नाही तर क्वांटिटी फार महत्वाची झाली आहे.अशा या नॉन अक्टर्स ना सोडून काही जण आहेत ज्यांना खरंच अभिनय कळतो, अभिनयाची जाण असते, तो जमतो आणि जमत नसेल तर खूप सारे प्रयत्न करून, लाज लज्जा सोडून, कोणाचीही तमा न बाळगता ती लोकं अभिनयाला हरवून त्याला आपलंस करून घेतात. त्यापैकीच एक उत्तम अभिनेता म्हणजे समीर परांजपे. सेटवर आल्यापासून पॅकअप होईपर्यंत त्याच एनर्जीने काम करताना अजिबात कसलीच तक्रार नाही की वेळेचं भान नाही. सगळ्या सहकलाकारांबरोबर मज्जा मस्ती करत ( विशेतः— आभा आणि दिनेश) कोणाबरोबर कसलेच हेवे-दावे न ठेवता सेटचं वातावरण हलकं करून उत्तम काम करणारा आमचा समीर आणि त्याचा आज वाढदिवस! "

पुढे त्यांनी म्हटलंय, "नेमका मतदानाच्या दिवशी समीर तुला भाजपाकडून कमळाच्या सुवासिक शुभेच्छा. शिवसेनेकडून धनुष्य बाणासारख्या ध्येयाचा निशाणा बरोबर साधण्याच्या शुभेच्छा. मनसेकडू आगगाडी सारख्या वेगवान पुढे जाण्याच्या शुभेच्छा. उबाठा कडून मशाली सारख्या ज्वलंत विचारांच्या शुभेच्छा.काँग्रेसच्या हाताकडून आशीर्वादाच्या शुभेच्छा.राष्ट्रवादी कडून घड्याळासारख्या नेहमी वेळ पाळण्याच्या शुभेच्छा. माझ्याकडून फक्त मनापासून खूप खूप शुभेच्छा! "

चंद्रकांत कानसे हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. वेगवेगळे मराठी चित्रपट तसेच मालिकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया