Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पत्र्याचं घर ते स्लॅबचा टुमदार बंगला! मराठी अभिनेत्याची स्वप्नपूर्ती, 'या' ठिकाणी बांधलंय 'ड्रीम होम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:28 IST

एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे! 'साधी माणसं' फेम अभिनेत्याने 'या' ठिकाणी बांधलंय ड्रीम होम, शेअर केली खास झलक

Aakash Nalawade: आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. यंदाच्या वर्षी मराठी कलाविश्वातील कलाकारांनी कुणी नवीकोरी गाडी घेत तर कुणी नव्या घरात गृहप्रवेश करत स्वप्न साकार केलं आहे. त्यात आता मराठी मालिकाविश्वातील आणखी एका अभिनेत्याची स्वप्नपूर्ती झाली आहे. हा अभिनेता म्हणजे आकाश नलावडे (Aakash Nalawade). साधी माणसं मालिकेतील सत्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे याने त्याच्या गावाकडं एक टुमदार घर बांधलं आहे. सोशळ मीडियावर आकाशने नव्या घराचा सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

दरम्यान, गावाकडील पडझड झालेल्या साध्या पत्र्याच्या घराला नवीन आकार देत अभिनेत्यानेने त्याच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं आहे. एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे... असं कॅप्शन देत आकाशने नवीन घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या व्हिडीओला 'होम गोल्स', 'ड्रीम होम' असे हॅशटॅग देत अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्याने त्याच्या मुळगावी नवं घर बांधत असल्याचं कळतंय.त्यामुळे अभिनेत्याचे चाहतेदेखील प्रचंड खुश असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याच्या या व्हिडीओवर मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींसह चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत अभिनेत्याला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

वर्कफ्रंट

आकाश नलावडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, स्टार प्रवाहवाहिनीवरील 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील पश्याच्या भूमिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. सध्या तो 'साधी माणसं' मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतो आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया