Join us

४ वर्षांचं नातं जगजाहीर करत 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली! कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 08:45 IST

मराठी अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली! फिल्मी अंदाजात केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, कोण आहे ती?

Rutwik Talwalkar : मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असते. हल्ली सोशल मीडियामुळे कलाकार आणि चाहत्यांमध्ये एक दुवा निर्माण झाला आहे. त्यामुळे कलाकारांबद्दल प्रत्येक अपडेट चाहत्यांना सहज मिळते. अशातच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार गेल्या काही महिन्यांमध्ये लग्नबंधनात अडकले. तर काहींनी अगदी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली. या यादीत आता आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं जाणार आहे. नुकतीच टीव्ही इंडस्ट्रीतील एका मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या...

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतून घराघरात पोहोलेला सोहम म्हणजेच अभिनेता ऋत्विक तळवलकर सोशल मीडियावर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करत आपलं प्रेम जगजागहीर केलं आहे. अभिनेत्याने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करत सोशल मीडियावर खास क्षण शेअर केले आहेत. "४ वर्षांचं रिलेशनशिप, ३ वर्षांची लॉंग डिस्टन्स जर्नी! २८ वर्ष या दिवसाची वाट पाहिली आणि आता तू माझी आहेस...", असं सुंदर कॅप्शन देत अभिनेत्याने त्याच्या मनातील प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत. ऋत्विक तळवलकरच्या गर्लफ्रेंडचं नाव अनुष्का चंदक असं आहे. अनुष्का एक उत्तम क्लासिकल डान्सर आहे. ऋत्विक आणि अनुष्काचं ड्रीम प्रपोजल अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. या फोटोंमध्ये त्यांनी एकमेकांना मिठी मारली आहे. शिवाय अनुष्काने तिच्या बोटातील अंगठी देखील फ्लॉन्ट केली आहे. 

ऋत्विक आणि अनुष्काचे फोटो पाहून मराठी सेलिब्रिटींनी आणि नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेता अक्षर कोठारी, अभिषेक रहाळकर, दिपाली पानसरे तसेच या कलाकारांनी ऋत्विकला पु़ढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया