Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेत्याचं धुळ्यात थाटात पार पडलं लग्न! पत्नी आहे कथ्थक नृत्यांगना, 'या' गाजलेल्या मालिकेत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:08 IST

मराठी मालिकाविश्वात काम करणारा लोकप्रिय अभिनेता नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.

Rutwik Talwalkar Wedding: सध्या मराठी कलविश्वात लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. येत्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. रेवती लेले, साक्षी महाजन या अभिनेत्रींचं नुकतंच केळवण पार पडलं आहे. लवकर त्यांचं लग्न होणार आहे. अशातच नुकतंच मराठीतील एक लोकप्रिय अभिनेता बोहल्यावर चढला आहे. हा अभिनेता ऋत्विक तळवळकर आहे. ऋत्विक तळवळकर आणि अनुष्का चांडक यांचा लग्नसोहळा धुळ्यात पार पडला. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्याने चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली आहे. 

अभिनेता ऋत्विक तळवळकर 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेतून घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेलं सोहम नावाचं पात्र चांगलंच लोकप्रिय ठरलं होतं. मालिका संपताच अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. अलिकडेच ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ऋत्विक तळवळकरने त्याचं नातं जगजाहीर केलं होतं. अलिकडेच जुलै महिन्यात अभिनेत्याने त्याच्या गर्लफ्रेंड अनुष्का चंदकला प्रपोज करत सोशल मीडियावर खास क्षण शेअर केले. त्यानंतर आता मोठ्या थाटामाटात त्याचा लग्नसोहळा पार पडला आहे.या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सर्वत्र बरेच व्हायरल झाले होते. यानंतर ही जोडी लग्न केव्हा करणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

ऋत्विक तळवलकरच्या पत्नीचं नाव अनुष्का चंदक असं आहे. अनुष्का एक उत्तम क्लासिकल डान्सर आहे.  सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडीओ उपलब्ध आहेत.ऋत्विक आणि अनुष्काच्या लग्नाचे फोटो पाहून मराठी सेलिब्रिटींनी आणि नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.अभिनेत्याच्या लग्नाला लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील कलाकारांची देखील हजेरी लावली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडिया