Jay Dudhane: मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार अलिकडच्या काही दिवसांमध्ये लग्नबंधनात अडकले. तर काही कलाकार येत्या काही दिवसांत विवाहबंधनात अडकणार आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच लक्ष्मी निवास फेम अभिनेता मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांचा लग्नसोहळा पार पडला. याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, तेजस्विनी लोणारी आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निमिष कुलकर्णी,पूजा बिरारी या कलाकारांनी आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधून नव्या प्रवासाला सुरुवात केली. यासह आता कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता लवकरच बोहल्यावर चढणार आहे, त्याचं नाव आहे जय दुधाणे.
नुकतंच जय दुधाणेचं केळवण पार पडलं आहे. जयच्या होणाऱ्या पत्नीचं नाव हर्षला पाटील असं आहे. गेली काही वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करीत होते. शिवाय अलिकडेच जयने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती.जयने मार्च महिन्यात हर्षलाला ते दोघे फिरायला गेले असताना त्याच्या हटके स्टाईलमध्ये प्रपोज केलं होतं. यावेळी हर्षलानंही होकार दिला होता. त्यानंतर सोशल मीडियावर या जोडीची बरीच चर्चा रंगली होती. आता लवकरच जय आणि हर्षला लग्नबेडीत अडकणार आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर जय दुधाणेच्या केळवणाचे फोटो,व्हिडीओ समोर आले आहेत. काल माजघर येथे जयचं केळवण थाटात पार पडलं. यावेळी जयसह त्याचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.
वर्कफ्रंट
जय दुधाणेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये तो चर्चेतील चेहरा होता. 'बिग बॉस मराठी ३'चा तो उपविजेता होता. तर 'MTV स्प्लिट्सविला १३'चा जय विनर होता. त्यानंतर जय येड लागलं प्रेमाचं या मालिकेतही दिसला होता.
Web Summary : After Pooja Birari, actor Jay Dudhane of 'Yed Lagla Premacha' is set to marry Harshala Patil. They dated for years and recently celebrated Kelvan. Jay proposed in March, and wedding preparations are underway.
Web Summary : पूजा बिरारी के बाद, 'येड लागला प्रेमाचा' के अभिनेता जय दुधाने हर्षला पाटिल से शादी करने वाले हैं। वे सालों से डेटिंग कर रहे थे और हाल ही में केलवन मनाया। जय ने मार्च में प्रपोज किया, और शादी की तैयारी चल रही है।