Television Actor: प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मटका किंग या सीरिजची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.मुंबईतला एकेकाळचा मटका किंग रतन खत्री याच्या आयुष्यावर ही सीरिज बेतलेली आहे. अलिकडेच ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.या सीरिजमध्ये अभिनेता विजय वर्माची मध्यवर्ती भूमिका आहे. या शिवाय सई ताम्हणकर, क्रितिका कामरा, गुलशन ग्रोवर, किशोर कदम, भरत जाधव तसेच गिरिश कुलकर्णी अशी तगड्या कलाकारांची फौज आहे.परंतु, तुम्हाला माहितीये का, या सीरिजमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आनंदी’ मालिकेतील एक अभिनेता झळकला आहे.
दरम्यान, या अभिनेत्याचं नाव शशांक दरणे आहे. सध्या शशांक दरणे आनंदी मालिकेत युगंधर साहेबांचा सहकारी शिर्केच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. अभिनेता शशांक दरणे याने आजवर अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच मोहित सुरींच्या सैयारा सिनेमात देखील झळकला आहे.
नुकतीच अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून मटाका किंगमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.या पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटलंय, "Dreams Come True", स्वामी कृपेनं मिळालेली एक संधी. नागराज मंजुळे दिग्गज दिग्दर्शक, अभिनेता विजय वर्मा, गुलशन ग्रोव्हर, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव यांच्या सारख्या सर्वार्थाने मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची मिळालेली संधी. अॅमेझॉन प्राईमवर 'मटका किंग' रिलीज झाली आहे. प्रेक्षकांना आवडतेय."
यापुढे अभिनेत्याने लिहिलंय,"या एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये माझी पण छोटीशी, पण इंटरेस्टिंग भूमिका यामध्ये आहे. काम करायला खूप मजा आली.सुधीर कुलकर्णी सर या प्रोजेक्टसाठी स्क्रिप्ट सुपरवायझर म्हणून काम बघत होते, त्यांच्या मुळे तिथ पर्यंत वर्णी लागू शकली." असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.दरम्यान, अभिनेता शशांक दरणेच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलंय.
Web Summary : Shashank Darne, from 'Anandi,' features in Nagraj Manjule's 'Matka King,' a series based on Mumbai's Matka King, Ratan Khatri. Darne shared his positive experience working alongside notable actors like Vijay Varma and expressed gratitude for the opportunity. He plays Shirke in 'Anandi'.
Web Summary : नागराज मंजुळे की 'मटका किंग' में 'आनंदी' धारावाहिक के शशांक दरणे भी हैं, जो रतन खत्री पर आधारित है। विजय वर्मा जैसे कलाकारों के साथ काम करने का अनुभव साझा किया और अवसर के लिए आभार व्यक्त किया। दरणे 'आनंदी' में शिर्के की भूमिका निभाते हैं।